Jan Nicol Loftie Eaton : नेपाळ तिरंगी T20 मालिका आजपासून सुरू झाली असून, कीर्तिपूर येथे नामिबिया आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली. नामिबिया संघाच्या वतीने मलन करुगर आणि जॅन निकोल लॉफ्टी ईटन यांनी शानदार फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत नेले.यावेळी जॅन ईटनने T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावत इतिहास रचला. त्याने 33 चेंडूंचा सामना करत झंझावाती शतक झळकावले.
जॅन निकोल लॉफ्टीने आपल्या तुफानी फटकेबाजीमध्ये 8 षटकार आणि 11 चौकारांसह 101 धावा ठोकल्या आणि आपल्या नावे विश्वातील एक नवीन रेकॉर्ड केला. | Jan Nicol Loftie Eaton
नेपाळच्या कुशल मल्लाने आशियाई खेळ 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठोकले होते, पण आता हे शतक जॅन निकोल लोफ्टीने मोडीत काढले आहे. लॉफ्टी ईटनने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावले. 33 चेंडूंचा सामना करत शतक झळकावून त्याने टी-20 क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला. | Jan Nicol Loftie Eaton
कुशल मल्लानंतर तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मिलरचे नाव आहे, ज्याने 2017 मध्ये 35 चेंडूत ही कामगिरी केली होती. भारतीय संघासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत ही कामगिरी केली.
T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज
1. यान निकोल लॉफ्टी – 33 चेंडूत शतक ठोकले (2024)
2. कुशाल मल्ला – 34 चेंडूत शतक ठोकले (2023)
3. डेव्हिड मिलर – 35 चेंडूत शतक ठोकले (2017)
4. रोहित शर्मा – 35 चेंडूत शतक ठोकले (2017)
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. संघातर्फे मालन कारुगरने 59 धावांची नाबाद खेळी केली. त्यांच्याशिवाय, लॉफ्टी ईटनने 101 धावांची तुफानी खेळी खेळली आणि ही धावसंख्या उभारण्यात संघाला महत्त्वपूर्ण मदत केली. अशा प्रकारे नेपाळ संघाला सामना जिंकण्यासाठी 207 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. | Jan Nicol Loftie Eaton
“मनोज जरांगे बीड लोकसभेसाठी मविआचे उमेदवार असणार” भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ