Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टी आज मंगळवारी (दि. 27) वाढीसह बंद झाले. मात्र लघु आणि मध्यम समभागांमध्ये घसरण दिसून आली. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 6,000 कोटी रुपयांचे नुकसना झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक आज अनुक्रमे 0.10% आणि 0.25% घसरले. आजच्या व्यवहारात ऑइल अँड गॅस, एनर्जी, युटिलिटी आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये घसरणीचा कल होता. दुसरीकडे, आयटी, रियल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑटोमोबाईल समभागांचे निर्देशांक वाढीसह बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 305.09 अंकांनी किंवा 0.42% ने वाढून 73,095.22 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 76.30 अंक किंवा 0.34% च्या वाढीसह 22,198.35 च्या पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे 6,000 कोटी रुपयांचे नुकसान –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 27 फेब्रुवारी रोजी 391.96 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवार, 26 फेब्रुवारी रोजी 392.02 लाख कोटी रुपये होते. BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 6,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.78% वाढ झाली आहे. यानंतर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 2.56 टक्के, इंडसइंड बँक 1.78 टक्के, पॉवर ग्रिड 1.65 टक्के, तर भारती एअरटेल शेअर्स 1.54 टक्क्यांनी वाढले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर उर्वरित 12 सेन्सेक्स समभाग घसरणीसह बंद झाले. त्यातही बजाज फायनान्सचे शेअर्स 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1.23 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.77 टक्के, ॲक्सिस बँक 0.55 टक्के आणि NTPC चे समभाग 0.46% च्या घसरणीसह लाल रंगात बंद झाले.
इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती –
2,284 समभाग घसरले –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या समभागांची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,929 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,552 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,284 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 93 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 327 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 20 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.