मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. या सर्वात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेगळा सूर लावला. त्यावरच आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
Ajit Pawar looking really desperate.
Wants to ensure that Sharad Pawar’s resignation is accepted
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 2, 2023
शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे.
दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाचे केले समर्थन केले आहे. अजित पवार म्हणाले की, “पवार साहेब निर्णय मागे घेणार नाही. नवीन अध्यक्ष पवारांच्या निर्णयाखाली काम करेल. पवार कुटुंबप्रमुखच राहणार आहेत. भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी न कधी येणारच होता.’ यावेळी निर्णय मागे घ्या असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील अजित पवारांनी सुनावले.