Ajit Pawar : जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, “आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
श्री. अजित पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष@AjitPawarSpeaks— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 6, 2024
दरम्यान, अजित पवार यांनी ट्विटमध्ये स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे. इतके दिवस अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हा शब्द वापरला नव्हता. पण आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे.