अजिंक्‍य रहाणेला परत आणा – नेटिझन्सची मागणी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-2 अशी गमावली. मालिकेच्या सुरुवातीला भारत 2-0 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर मात्र सलग तीन सामने भारताने गमावले आणि मालिका ऑस्ट्रेलियाने खेचून नेली. या मालिकेत भारताच्या फलंदाजीवर बरेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. मालिकेत भारतीय फलंदाजांनी निराशा केली.

प्रामुख्याने मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, लोकेश राहुल, विजय शंकर, रवींद्र जाडेजा या फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी न केल्यामुळे भारताला मालिका गमवावी लागली. म्हणूनच सामना आणि मालिका गमावल्यानंतर नेटिझन्सने मराठमोळा अजिंक्‍य रहाणे याला विश्‍वचषक स्पर्धेसाठी संधी देण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.