#ENGvIND : अजिंक्‍य रहाणे ठरला तंदुरुस्त

लंडन – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्‍य रहाणे तंदुरुस्त ठरल्यामुळे विराट कोहलीच्या संघाला दिलासा मिळाला आहे.

त्याच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळेच त्याने काऊंटी इलेव्हनविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती. त्याला इंजेक्‍शन्सही देण्यात आले होते. आता तो पूर्ण तंदुरुस्त ठरला असून त्याने संघाच्या सरावातही सहभाग घेतला.

येत्या चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या नॉटिंगहॅम कसोटीपूर्वी त्याने सराव सुरू केल्याने कोहलीला समाधान मिळाले आहे.

भारतीय संघ सध्या सरावासाठी डरहॅममध्ये आहे. रहाणेने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीचा सरावही केल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.