यशराज फिल्म्सच्या मेगा प्रोजेक्‍टमध्ये झळकणार अजय देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा “तानाजी ः द अनसंग वॉरियर’मध्ये वीरयोद्धा तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकला होता. हा अजय देवगणचा 100वा चित्रपट होता. याचदरम्यान, अजय देवगण हा यशराज फिल्म्सच्या एका मेगा प्रोजेक्‍टमध्ये काम करणार असल्याचे समजते.

मात्र, या मेगा बजेट चित्रपटाचे नाव समजले नसून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आदित्य चोप्रा याने आपल्या आगामी ड्रीम प्रोजेक्‍टसाठी अजय देवगणला साईन केले आहे.

यंदाच्या वर्षी यशराज फिल्म्सला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त या चित्रपटाची घोषणा करून सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवैल यांचा मुलगा शिव रवैल हा करणार आहे. तीन दशकांच्या दीर्घ करियरमध्ये अजय देवगण पहिल्यांदाच यशराज फिल्म्समध्ये काम करणार आहे. या चित्रपटासंबंधी गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अजय देवगणचा “भूज ः द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात अजय देवगण स्क्‍वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटानंतर तो रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’ चित्रपटात काम करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.