मुंबई – सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे किती लूकलाईक्स आहेत, हे माहित नाही. तुमचा फोन स्क्रोल करताना तुम्ही सुद्धा करिश्मा कपूर, करीना कपूर, राणी मुखर्जी, काजोल, शाहिद कपूर, अमिताभ बच्चन इत्यादींचे दिसले असतील. अशात अजय देवगणचा लुक आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अजय देवगणचा एक लूक चर्चेत आहे.ज्यामध्ये एक व्यक्ती अजय देवगणची नक्कल करण्याचा प्रयत्न करते. तो ज्या पद्धतीने एक्सप्रेशन देतो ते पाहून सोशलवर त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे.
अजय देवगणसारख्या या दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे अजय वर्मा असून त्याचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलो आहे. सोशलवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती अजय देवगणसारखी एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी एक महिलाही त्याला या कृत्यात साथ देत आहे. दोघांची ही रील इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. रीलवर लोकांच्या अनेक मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की,’याला करिश्मा कपूर मिळाली आणि तुम्ही दोघे संपूर्ण चित्रपट बनवू शकता’. तर दुसर्याने लिहिले, ‘अजय देवगण कमी बजेटसह’. आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘शक्ति कपूरच्या आत्म्यात प्रवेश झाला आहे’. अशा प्रकारे लोक या व्हिडिओवर खूप मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.