दुबई :– प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्याचे कोलकाता नाईट रायडर्सच्या स्वप्नांना चेन्नई सुपर किंग्जने धक्का दिल्यामुळे त्यांची आज राजस्थान रॉयल्सशी होणारी लढत अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
राजस्थान विरूध्द कोलकाता या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पू्र्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा राजस्थान राॅयल्सच्या बाजूनं लागला आहे. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने गोलंदाजी स्किकारताना कोलकाता संघास फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Match 54 – @rajasthanroyals win the toss and they will bowl first against #KKR.#Dream11IPL pic.twitter.com/N4Ov9CVNQS
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
आज होणाऱ्या सामन्यात जर कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला व दुसरीकडे पंजाबने चेन्नईचा पराभव केला तर कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.