मुंबई – अभिनेत्री ऐश्वर्या रायचा मल्टीस्टारर चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 1’ सुपरहीट झाला होता. त्यानंतर आता तिच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होताच लोकांनी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ‘पोनियिन सेल्वन 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.
PS2 चित्रपटाने पहिल्या दिवशी 32 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 28. 55 कोटींचा गल्ला जमावला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने 52. 55 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. फर्स्ट डे PS2 ने जगभरात 64.14 कोटींचे कलेक्शन केले. तसेच आता सुट्ट्यांचे दिवस असल्याने या चित्रपटाच्या कमाईत अधिक भर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, ऐश्वर्या रायने मोठ्या ब्रेकनंतर ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या चित्रपटापटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केले होते. यात तिने नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. यातील तिच्या अभियाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. जगभरात ‘पोन्नियिन सेल्वन 1’ ने 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
या चित्रपटात चियान विक्रम, जयम रवी, कार्ती आणि त्रिशा कृष्णन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय प्रकाश राज, आर सरथ कुमार, प्रभू, पार्थियान, जयम रवी हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात दमदार कलाकारांची मेजवानी पाहाता येणार आहे.