मुंबई – टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हिटमॅनला सोशल मीडियावरून चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे अनेक खेळाडू देखील व्यस्त आहे. अशात युजवेंद्र चहलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो कि रोहित शर्माच्या बर्थडे पार्टीनंतरचा असल्याचे बोलले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहलला चालताना देखील त्रास होत असलयाचे समजते. यावेळी चहल इतका मद्यधुंद अवस्थेत होता कि त्याला गाडीत बसण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागला. तसेच यावेळी चहल कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांनी रोहित शर्माची बर्थडे पार्टी झाल्यानंतरच हा व्हिडीओ असल्याचे म्हंटले आहे.
युजवेंद्र चहल सध्याच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही आहे.अधिकृतपणे या व्हिडिओबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र अनेक नेटकऱ्यांनी हा रोहितच्या पार्टी नंतरचा व्हिडीओ असल्याचे म्हंटले आहे.
आराम से चहल भाई , टीम को आपकी जरूरत है !!#yuzvendrachahal pic.twitter.com/3vf6hEGRmv
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) April 29, 2023
आज रोहित शर्माचा जन्म दिवस आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये नेतृत्व करत असलेली मुंबई इंडियन्स सध्या चांगलीच फॉर्मात आहे. मात्र मुंबईसमोर सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंची डोकेदुखी वाढत चालली आहे. अशात आगामी होणाऱ्या राजस्थान विरुद्ध मुंबईच्या मॅचकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.