मुंबई – पोनियिन सेल्वन या शुक्रवारी रिलीज होत आहे. मल्टीस्टारर चित्रपटाचे आक्रमक प्रमोशन केले जात आहे. दक्षिण ते उत्तर पट्ट्यापर्यंत पोनियिन सेल्वनचे स्टार्स चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.
पोन्नियिन सेल्वनची स्टारकास्ट देखील भारतीय टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहोचली. शोमध्ये खूप धमाल-मस्ती झाली. पण एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येत आहे, ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन ‘द कपिल शर्मा शो’ पर्यंत पोहोचली नाही.
द कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडमध्ये पोनियिन सेल्वनचे स्टार्स पाहुणे म्हणून दिसणार आहेत. विक्रम आणि त्रिशा यांनीही या शोमध्ये भरपूर कंटेंट दिला आहे. पण बॉलिवूड ब्युटी ऐश्वर्या राय बच्चन न दिसल्यामुळे चाहते थोडे नाराज दिसत आहेत. प्रोमोमध्ये किंवा व्हायरल झालेल्या फोटोंमध्येही ऐश्वर्याची उपस्थिती दिसली नाही. शोमध्ये ऐश्वर्या राय बच्चनही दिसली असती तर मजा द्विगुणित झाली असती. पण शोमध्ये ऐश्वर्या राय आली नाही.
द कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्या राय दिसली नसल्याचे सलमान खान कनेक्शन असल्याचे सोशलव चर्चा आहे. कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान असल्यामुळे या अभिनेत्रीने कॉमेडी शोमध्ये येणे वगळले असे युजर्सचे मत आहे.
अनेकांनी ऐश्वर्याची अनुपस्थिती सलमानसोबत जोडली, तर काही चाहते ऐश्वर्या रायचा बचाव करताना दिसले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीने शोमध्ये ए दिल है मुश्किल या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. याला उत्तर देताना दुसर्या यूजरने लिहिले ऐश्वर्या शोमध्ये आली होती, पण तेव्हा सलमान शोचा निर्माता नव्हता. त्या व्यक्तीने लिहिले,’कलाकार वेगवेगळ्या मुलाखती देणार आहेत, ऐश्वर्या राय इतरत्र प्रमोशनमध्ये व्यस्त असेल.’