मुंबई – सुबोध भावे हा एक प्रगल्भ अभिनेता आहे म्हणूनच अनेक बायोपिक करूनही त्याने आपली खास शैली जपली आहे. आजवर लोकमान्य,बालगंधर्व,डॉ काशिनाथ घाणेकर साकारलेला सुबोध भावे आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे पोस्टर सुबोध भावेने शेअर केले आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लूक पाहून चित्रपटाबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे. हर हर महादेव चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सुबोध लिहितो,”अखंड स्वराज्याचं स्वप्न पाहणारा तो राजा रयतेचा,मराठी रक्तासाठी लढणारा तो लेक जिजाऊचा,गनिमाच्या चिंध्या करणारा तो चालक भवानी तलवारीचा,एकमेव जो छत्रपती झाला तो भक्त जगदंबेचा…” यापूर्वी या चित्रपटाच्या झलक स्वरूपातील टीजर समोर आला होता ज्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिला होता.
View this post on Instagram
आता अभिमानाने मोठ्या पडदयावर ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना घुमणार ,पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून, येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे देखील यावेळी सुबोध भावेने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. अभिजीत देशपांडेने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.