Yukta Biyani Youngest Pilot| आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातील नांदेडच्या एका तरुणीने मोठे यश संपादन केले आहे. अवघ्या 19 वर्षाच्या युक्ता बियानी या तरुणीने कमी वयात पायलट होण्याचा बहुमान मिळवला आहे. तिच्या या कामगिरीने तरुण पिढीमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे.
सहसा या वयात अनेकांना वयात करियरची दिशा ठरवण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र त्याच वयात युक्ताने मोठे यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक केले जात आहे.
लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण
नांदेडच्या युक्ता बियानीने वयाच्या 19व्या वर्षी पायलट बनून नवीन इतिहास रचला आहे. यापूर्वी 21 वर्षांच्या तरुणीने पायलट बनण्याचा बहुमान पटकावला होता. मात्र आता महाराष्ट्रातील नांदेड येथे राहणारी युक्ता बियाणी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पायलट बनली. तिने 200 तास विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तिचे लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न होते, त्यानंतर 12वीनंतर तिने 6 महिने मुंबईत प्रशिक्षण घेतले. Yukta Biyani Youngest Pilot|
यानंतर युक्ताची बारामती येथील फ्लाईंग स्कुलमध्ये निवड झाली. या प्रशिक्षणादरम्यान युक्ताने तब्बल 200 तास विमान चालवले. या कामगिरीनंतर आणि आपल्या पायलट बनण्याच्या स्वप्नावर शिक्कामोर्तब केले. युक्ता आता लवकरच एअर इंडियात अप्लाय करणार आहे. तिथं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एअर इंडियात सेवा देण्याचा निश्चय तिने केला आहे. सध्या तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. Yukta Biyani Youngest Pilot|
हेही वाचा:
भाजप नेते अशोक चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला ; मध्यरात्री १ वाजेपर्यंत ‘या’ मुद्दयांवर झाली चर्चा