राजूर – येथील राजूर पोलीस स्टेशनमध्ये असलेले साईबाबा मंदिर हजारोंच्या पंक्तीने उजळून गेले. मंदिर भक्त परिवाराच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आली. यानिमित्ताने हजारो दिव्यांची रोषणाई, फुलांची मनमोहक सजावट देवालयाच्या परिसरात करण्यात आली होती. हजारो भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
येथील राजूर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्यावतीने हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून गेला होता. दिव्यांनी ओम आकाराची काढलेली रांगोळी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्व २००० पणत्या प्रज्वलित झाल्यावर हे दृश पाहण्यासाठी राजूरकर व भाविकांनी गर्दी केली होती. हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्ये फोटो घेण्याची स्पर्धाच जणू येथे पाहायला मिळाली. हा मनमोहक नजारा सर्व भाविक भक्तांना खिळवून ठेवताना दिसत होता.राजूर पोलीस स्टेशन व भाविकांनी वर्गणीतून या मंदिराचा जीर्णीद्धार केला आहे. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे , लक्ष्मण जाधव, सरपंच पुष्पा निघळे, पुष्पा लाहामटे आदींसह राजूर ग्रामस्थ उपस्थित होते.