नगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले पदयात्रेचे नगर शहरातील बाराबाभळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जंग्गी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता. यावेळी सकल मराठा समाज तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पदयात्रेत सहभागी आंदोलकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.
मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रेला अंतरवाली सराटी येथून शनिवारी प्रारंभ झाला. ही पदयात्रा पाथर्डीमार्गे रविवारी सायंकाळी मुक्कामी बाराबाभळी येथे दिडशे एकराच्या आवाता रात्री उशिरा सभा झाली. या पदयात्रेत सुमारे 10 ते 12 लाख मराठा समाज सहभागी झाला असल्याचा आंदाज वर्तविला जात आहे.
नगर ते बाराबाभळी दुतर्फा रस्ता बंद
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून पोलीस प्रशासनाच्यावतीने नगर ते बाराबाभळी या दरम्यान पाथर्डी रोडवर रस्ता दुतर्फा बॅरिकेटींग करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा बंदोबस्त मोर्चा नगर शहरातून आज दुपारपर्यंत पुढे गेल्यानंतर काढण्यात येणार आहे. यासह दुपारपर्यंत या ठिकाणी पोलिसांच्यावतीने तपासणी, नाके लावण्यात आले होते. येणार्या-जाणार्या वाहनांची चौकशी करून त्यांना पुढे सोडण्यात येत होते. पोलिसांची मोर्चाच्या मार्गावर गस्त सुरू होती.
मैदानावर फुड पॅकेटसह पाण्याच्या बाटल्या
जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे बाराबाभळीच्या मैदानावर आगमन झाल्यानंतर त्याठिकाणी सभेचे नियोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी मैदानावर टप्प्याने अंतर सोडून पाण्याच्या बटल्याचे बॉक्स आणि जेवणासाठी फुड पॅकेट एका रांगेत लावून ठेवण्यात आले. जरांगे यांच्या सभेसाठी दूर अंतरावर भव्य व्यासपिठ उभारण्यात आले होते. तर मैदानावर जागोजागी लोखंडी स्टॅण्डवर माईक यंत्रणा उभारण्यात आली होती. यासह मैदानात जागोजागी शिवाजी महाराज यांचे फोटो असणारे भगवे ध्वज लावण्यात आले होते.
मैदानावर स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या मुक्कामाच्या ठिकाणी बाराबाभळी येथे स्वतंत्रपणे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चात येणारी वाहने आणि जरांगे यांच्या सभेसाठी येणारे यांची वाहने स्वतंत्रपणे पार्क करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. बाराबाभळी येथील सुमारे 150 एकरवरच्या मोकळ्या मैदानावर जारांगे पाटील यांचा मोर्चाचा दुसरा मुक्काम झाला. या ठिकाणी उपस्थितीत राहणार्यांसाठी सकल मराठा समाज आणि मुस्लिम बांधव यांच्यावतीने ही व्यवस्था करण्यात आली होती.
सामाजिक ऐक्याचे दर्शन; मदरसावर भगवा;
जरांगे पाटील यांच्या नगरजवळील मुक्कामानंतर आज सकाळी हा मोर्चा नगर शहरमार्ग पुणे रस्त्यांने पुढे जाणार आहे. या मोर्चाचे दुपारचे जेवण सुपा या ठिकाणी होणार असून तत्पूर्वी सकाळी उठरल्यानंतर मोर्चात सहभागी नागरिकांच्या नास्त्याची व्यवस्था बाराबाभळीच्या मदरशामधील मुस्लिम बांधव यांच्यावतीने करण्यात आली. या ठिकाणी हे मुस्लिम बांधव स्वयंसेवका म्हणून काम करतांना दिसले. तसेच सामाजिक ऐक्याचे प्रतिक म्हणून मदरसावर भगवे झेडे लावण्यात आले.
सकल मराठाच्या डॉक्टरांची टीम सज्ज
आंतरावली सराटीवरून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे रविवारी सायंकाळी उशीरा नगरजवळील बाराबाभळी याठिकाणी आगमन झाले. यावेळी मोर्चात सहभागी लोकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी नगरच्या सकल मराठा समाजाच्यावतीन डॉक्टरांची टीम सज्ज होती. या टीममध्ये जवळपास 150 डॉक्टरांची उपस्थिती होती. दरम्यान, दुपारपासून बाराबाभळी याठिकाणी मोर्चेकरी यांच्या मुक्कामाचे नियोजन करण्यात आले होते. पिण्याचे पाणी, जेवणासह त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सोय करण्यात आली होती. नगरच्या सकल मराठा डॉक्टरर्स यांच्यावतीने बाराबाभळी या विविध ठिकाणी 150 वैद्यकीय बेडसह प्राथमिक उपचारांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. यासह 10 रुग्णवाहीका या ठिकाणी सज्ज ठवण्यात आल्या होत्या. तसेच मोर्चात सहभागी झालेल्यांना काही अडचण आल्यास शहरातील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार असल्याचे नगर डॉक्टर्स सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.