नेवासा – नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथे चंपाषष्ठीनिमित्त सात दिवस चालणाऱ्या खंडोबाच्या यात्रेची कुस्तीच्या जंगी हागाम्याने सांगता करण्यात आली.
महालक्ष्मी हिवरा येथे देवस्थान ट्रस्टच्यावतीने यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमासह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात कावड मिरवणूक, छबिना, हजेऱ्या, कीर्तन, तमाशा, हगामा, आरोग्य शिबीर या सारखे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. येथील खंडोबा मंदिर हे पुरातन असून जागृत देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांसह गावातील नोकरीनिमित्त वर्षभर बाहेरगावी असलेले सर्व ग्रामस्थ यात्रेसाठी आवर्जून येत असल्याने या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
नेवासा तालुक्यात सर्वात जास्त कालावधीत चालणारी यात्रा म्हणून जिल्ह्यात हिवरा येथील खंडोबाच्या यात्रेचा नावलौकिक आहे. या यात्रा उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या हगाम्यात मल्लांच्या ११ हजार रुपये इनाम देऊन शेवटची कुस्ती लावण्यात आली. हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गायके, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक केदार, उपाध्यक्ष पप्पू गायके, राजू पालवे, उद्धव सांगळे, गोरख गायके, महादेव गायके, भाऊसाहेब शेळके, आदिनाथ शिरसाठ, सोमनाथ सानप, निवृत्ती सानप, रावसाहेब गायके, बंडू पालवे, विजय सानप, भाऊसाहेब सानप, एकनाथ जगताप, पोपट आव्हाड, मिनीनाथ शिरसाट, मिनीनाथ गायके, उत्तम आव्हाड, अशोक जगताप, अरुण बोरुडे, भगवान चौधर, सोमनाथ चौधर, भगवान सांगळे, सोमनाथ पालवे, महादेव सानप, नागनाथ गायके यांनी परिश्रम घेतले.