नगर – जिल्ह्यात आज 215 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 64 हजार 275 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.61 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 123 ने वाढ झाली. तसेच जिल्ह्यात आज करोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तसेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 263 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 26, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 45 आणि अँटिजेन चाचणीत 52 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 10, अकोले 1, जामखेड 2, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 4, श्रीगोंदा 5 आणि कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 13, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 3, पारनेर 3, राहाता 9, राहुरी 1, संगमनेर 14, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 52 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 1, जामखेड 3, कर्जत 3, कोपरगाव 8 नगर ग्रामीण 3, नेवासे 2, राहाता 8, संगमनेर 17, शेवगाव 1, श्रीगोंदा 2 आणि श्रीरामपूर 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 57, अकोले 7, कर्जत 6, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 12, नेवासे 15, पारनेर 11, पाथर्डी 5, राहाता 30, राहुरी 9, संगमनेर 41, शेवगाव 4, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 14, अशा रुग्णांचा समावेश आहे.