“फी’ नाही तर शाळा नाही! खासगी शाळांचे 3 दिवस ऑनलाईन शिक्षण बंद

पिंपरी – करोनाच्या परिस्थितीत अनेक शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे.त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. पालक शाळेची फी भरेनासे झाले आहेत. त्यामुळे फी नाही तर शाळा नाही असा निर्णय फेडरेशन ऑफ स्कूलस असोसिएशन महाराष्ट या संघटनेने घेतला आहे.

शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापुढे शिक्षण सुरू ठेवणे आम्हाला अशक्य आहे.त्यामुळे संघटना 3 दिवसांचे शाळा बंद आंदोलन पुकारत आहे. या 3 दिवसात खाजगी शाळांचे शैक्षणिक कामकाज पूर्ण बंद राहील. या बंद च्या माध्यमातून राज्यातील खाजगी शाळांची दयनीय अवस्था सर्वांच्या नजरेत येईल म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.