जामखेड – शहरात पेट्रोल चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात शहरातील विविध भागातुन या टोळीने सुमारे हजारो लिटरची पेट्रोल चोरी केली आहे. ही टोळी वाहनांचे नुकसान कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता पेट्रोल चोरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अनेक वाहनांमधील पेट्रोल रोज चोरीला जात असतानाही एकाही व्यक्तीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण केल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक रस्त्यावर, अंगणात, खुल्या जागेत बिनधास्त आपली वाहने रात्री उभी करतात. काहीवेळा वाहनांच्या किल्ल्याही काढल्या जात नाहीत; याचाच फायदा घेत गेल्या दोन ते तीन दिवसात शहरातील विविध ठिकाणाहून पेट्रोलचोरीच्या बातम्या येऊ लागल्या. यामध्ये कोर्ट रोड लोकमान्य वाचनालया पाठीमागील परिसर.
बस स्थानक परिसर खर्डा रोड. शिवाजी नगर परिसरातील पेट्रोलचोरीच्या घटना जास्त आहेत. पेट्रोल चोरणारे टोळके सहजगत्या पेट्रोल चोरत असल्याचे दिसून येत आहे कोर्ट रोड वरील परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी चार दुचाकीस्वाराच्या पेट्रोलचा कॉक तोडून आठ ते दहा लिटर पेट्रोल चोरले गेले. अशा कृत्यामुळे वाहनमालकांचे नुकसान होत आहे. दरम्यान याच परिसरातील एका युवक रात्री उशिरा घरी येत असताना त्यांना गल्लीमध्ये रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकी गाडीतुन पाईप व्दारे पेट्रोल काढून ते बाटलीत भरले जात असल्याचे दिसून आले सदरील युवकास आसपास कोणीही दिसले नाही त्यामुळे त्याला संशय आला पुढे जाऊन आजुन दोन तीन दुचाकींमधुन अशाच प्रकारे पेट्रोल काढून टाकण्याचा प्रकार दिसुन आल्याने सदरील पेट्रोल चोरी होत असल्याचे निदर्शनास आले त्यानी दुचाकी मालकांना बोलावून घडलेला प्रकार सांगितल्याने एकच खळबळ उडाली
सुरवातीला एक दोन गाडीतील पेट्रोल गेले असेल असे समजून नागरिक गप्प होते; मात्र आता गावगप्पांमधून विविध ठिकाणी होणाऱ्या पेट्रोलचोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. या सर्व घटनांनंतर कोणीही पोलिसात तक्रार केलेली नाही.
चौकट
पोलिसांनी गस्त वाढवावी..!
याबाबत पत्रकार ओंकार दळवी यांनी याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. पेट्रोल चोरीमुळे नुकसान झालेल्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली तर वेगवेगळ्या घटनांमधील पेट्रोल चोरांची कार्यपद्धती समोर येइल. चौकशीतून चोर गावातले की बाहेरचे आहेत, अशी माहिती मिळू शकते. त्यामुळे पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक पाटील यांनी केले आहे