Amrita Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करतात त्या आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या आहे. अशात यावेळी त्यांनी उखाण्यातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतेच नागपूरमध्ये भारतीय जानता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. या उपस्थितांनी अमृता फडणवीस यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला.
अशात अमृता फडणवीस यांनी उखाणा घेतला की,’देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वान, आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण” असा उखाणा घेतला. यावेळी उपस्थितांना टाळ्या वाजवून अमृता फडणवीसांना दाद दिली.