‘त्या’ भेटीनंतर राज ठाकरेंवर संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी या भेटीवर खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी राज ठाकरे-सोनिया गांधींच्या भेटीवर टोला लगावला आहे की,’लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोघेही पंढरपुरात गेले आणि विठ्ठलाची भेट घेतली तर बिघडलं कुठे? असेही राऊत म्हणाले.

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. उभय नेत्यांमधील चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरने घेण्याच्या मुद्यावर विस्तृत चर्चा झाली होती. राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे  महाराष्ट्रात येत्या विधानसभेला नवी राजकीय जुळवाजुळव पाहायला मिळेल, अशी शक्‍यता बळावली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.