मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनातील मुलाखतीमध्ये भाजपला सरकार पाडण्याचं आव्हान दिलं होतं. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
वारंवार म्हटलं जातं की आमचं सरकार पाडून दाखवा. आधी सरकार चालवून दाखवा. पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की सरकार चालवून तर दाखवा. तुमचं सरकार एवढ्या अंतर्विरोधाने भरलेलं आहे की आम्हाला पाडायची आवश्यकता नसल्याचे देवेंद्र फडणवीस.
“एकमेकांच्या तंगड्या तोडायला तुम्हीच सज्ज व्हाल आणि तेच तुम्ही रोज करता. अंतर्विरोधानेच एक दिवस तुमचं सरकार कोसळणार आहे. आम्ही तोपर्यंत वाट पाहायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे हे आम्ही निश्चितपणे ठरवू”,असे देखील फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेश राज्यकार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीत चंद्रकांत पाटील. विनोद तावडे, वीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयातून बैठकीला उपस्थित होते.