लॉकडाउन सुरू झाल्यापासून गरजूंना मदत करण्यामध्ये अभिनेता सोनू सूद सध्या भरपूर चर्चेत असतो. अख्या देशात लॉकडाउन झाले होते तेव्हा प्रवासी मजूर, विद्यार्थी आणि गरजू यांना सोनू सुदने मदत केली होती आणि त्यांना घरी पोचण्यास सहकार्य केले होते. आतापर्यंत खूप लोकांनी त्याची मदत मागितली आहे. आता तर विदेशातून देखील त्याला मदत मागण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी सोनू सूद सोशल मीडिया वर नेहमी सक्रिय असतो. त्याबरोबरच याद्वारे त्याच्याकडे खूप लोक मदत देखील मागत आहेत. सध्याच दीक्षा नावाच्या एका सोशल मीडिया युझरने सोनूकडे मदत मागिलती आहे. जॉर्जियाची राजधानी त्बिलिसीमध्ये काही भारतीय विद्यार्थी फसले आहेत, त्यामुळे त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी मदत मागितली आहे.
दीक्षा लिहते की, ” त्बिलिसी, जॉर्जियामध्ये ५० हून अधिक विद्यार्थी आहेत ज्यांना परत भारतात जायचे आहे. सोनू सूद कृपया मदत करा. मी सकाळ-संध्याकाळ ट्विट करत आहे. कृपया माझ्या भावाला परत आणा. आमच्या आजोबांचे निधन झाले आहे. आमचे कुटुंब खूप नैराश्यातून जात आहे.” दीक्षाच्या या ट्विटला सोनूने लवकरच आपला प्रतिसाद दिला.
अभिनेता सोनू सुदने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘न्यू मिशन’. सोनू सूद यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटला त्याचे अनेक चाहते प्रतिसाद देत आहेत. अलीकडेच सोनुने आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबाला नवीन ट्रॅक्टर देऊन मदत केली आहे.