नवी दिल्ली : श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि आयएएस टीना दाबी यांचे पूर्वाश्रमीचे पती आयएएस अतहर आमिर खान पुन्हा विवाहबंधनात अडकले आहे. आमिरने डॉ. महरीन काजी यांच्याशी विवाह केला आहे. लग्नानंतर अतहर यांनी आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अतहर आणि महरीन यांचा साखरपुडा जुलै महिन्यात झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत कायमच चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान 1 ऑक्टोबरला दोघेहे विवाहबंधनात अडकले. अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत अतहर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर महरीन काजी लेहंग्यामध्ये दिसत आहे.
महरीन यांनी आपल्या हातावर उर्दू भाषेत अतहरचे नाव लिहिले असून त्याचा फोटो स्वत: शेअर केला आहे. डॉक्टर मेहरीन काजी या श्रीनगरमधील आहेत. महरीन काजी या राजीव गांधी कन्सर संस्थान आणि अनुसंधान केंद्रात कार्यरत आहे. फक्त मेडिकल क्षेत्रात नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील त्य सक्रिय आहेत.
मीडिया रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, अतहर आणि महरीन अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. महरीन यांनी यूके आणि जर्मनीत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. महरीन यांचे इन्स्टाग्रामवर साडे तीन लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.