सांगोल येथील केदारवाडी रोडवर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवणानंतर रात्री घरापासून शतपावली करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) असे त्यांचे नाव आहे. ते सांगली शहर पोलीस दलात कार्यरत होते.
बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.