मुंबई – अभिनेता रणवीर सिंगचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने पाच दिवसात 60.17 कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटातील ‘झुमका’ हे गाणं सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालत आहे. अनेकजण या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. त्यानंतर रणवीरने त्याच्या आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणवीरने आजोबांसोबतचा एक हटके फोटो शेअर केला आहे. सोबतच त्याने दोघांच्या डान्सचा व्हिडीओही शेअर केला आहे. झुमकाच्या ओरिजनल गाण्यावर ते डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रणवीरने ‘Nana is peak Rocky-ism! 93 and Rock(y)ing,’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये रणवीरने निळ्या रंगाचं स्वेट शर्ट परिधान केलं आहे. तर त्याच्या आजोबांनी काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं असून त्यावर ‘टीम रॉकी’ असं लिहिलं आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ते अनेकांच्या पसंतीस देखील पडत आहे.
View this post on Instagram
रणवीरच्या या पोस्टवर अनेक सिनेकलाकारांनी कमेंट करत कौतुक केले आहे. दिग्दर्शक करण जोहर म्हणाला, ‘दोघेही हॅन्डसम दिसत आहात’, तर क्रिती सेनन म्हणाली, ‘सुपर कूल,’ आणि झरीन खान ‘किती कूल ना’ असे म्हणाली. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्टसह धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील आहेत.