नवी दिल्ली – गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुलेआम हत्या केली. पोलीस या दोन्ही गॅंगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशी हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ही सर्व घटना घडली. यानंतर तिन्ही आरोपींनी आत्मसमर्पण केले. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अजूनही पुढे आले नाही. दरम्यान, गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येमुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
An extra judicial killing or an encounter is not something to be celebrated. It signals a state of lawlessness. It signals that the State agencies have depleted credibility because they are acting like or enabling criminals. This is not strong governance, this is anarchy.
— Swara Bhasker (@ReallySwara) April 15, 2023
अश्यातच, आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेसुद्धा एक ट्विट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, तिच्या या ट्विटमुळे अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केलं आहे. स्वरा भास्कर नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. स्वरा भास्कर सतत विविध ज्वलंत विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसून येते.
दरम्यान, स्वरा भास्करने ट्विटरवर ट्विट करत लिहलंय की… ‘अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद साजरी करण्यासारखी गोष्ट नाही. हे राज्याच्या अराजकतेची स्थिती दर्शवते. हे सूचित करते की राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करत आहेत. हा भक्कम कारभार नाही. ही अराजकता आहे.’ या आशयाचे ट्विट तिने केलं आहे.