सोमेश्वरनगर: दहावी पर्यंत विद्यार्थी व विद्यार्थीनी एकत्र राहीले. मित्र मैत्रीणीच्या पलिकडे नाते जपत प्रत्येक वर्षी मुली त्याना राखी बांधत. मात्र दहावी नंतर सगळे आपापल्या शिक्षणात व्यवसायात जाण्यासाठी शाळेचा निरोप घेतला त्यामुळे शाळेतल्या मुली परत भेटल्याच नाही.
त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षकांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करायची राहीली होती. त्यामुळे विद्यार्थ्यानी व्हाट्स अप द्वारे गृप बनवीत एकत्र येवुन शिक्षकांप्रती कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. या वेळी शाळेला भव्य साऊंड सिस्टीम व सामग्री देत आणि वर्गातील मुलींना भाऊबीजेनिमित्त माहेरची साडी देत स्नेहमेळावा साजरा केला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथील मार्च १९८७-८८ सालच्या विद्यार्थ्यानी अशा पद्धतीने साजरा केलेल्या मेळाव्याने शिक्षक वृंद पण गहिवरुन गेले व आम्ही केलेल्या संस्काराचे चिज झाल्याचे समाधान व्यक्त केले .
त्या वेळी वर्गात पहिले तीन आलेल्या मुलांचे सत्कार करणेत आले. त्यावेळचे विद्यार्थी व आता शिक्षक असलेले अशोक कोळेकर, अशोक नारायण भोसले यांच्यासह विजय वायसे,सर्वेश वाघ,डॉ प्रदीप भोसले यानी कार्यक्रमाचे आयोजन केले.