पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी देखील सत्ता स्थापने बाबत कशी स्पष्ट संकेत मिळताना पाहायला मिळत नाहीत, जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन देखील भाजप सेनेतील अंतर्गत वादामुळे ते अद्याप तरी सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या संदर्भात सोशल मीडियावर चांगलेच मिम्स व्हायरल होत आहेत.
अभिनेता अनिल कपूर ‘नायक’ सिनेमात 24 तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता. त्याचा संदर्भ सद्यपरिस्थितीशी जोडत अनिल कपूर आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटोखाली `महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. उद्या होणार शपथविधी’ असं लिहून शेअर केलं आहे.
एका कार्टून मध्ये “इतकाही वेळ लावू नका नाही तर लोक म्हणतील सरकार नसलं तरी चालतंय”, असा टोमणा मारण्यात आला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या कवितामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. आणि या संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचंही एक मिम्स जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या राज्यातील पाऊस हा काही तुह्माबण्याचे नाव घेत नसल्याने पाऊस सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहूनच जाणार आहे अशा आशयाचे एक मिम्स व्हायरल होत आहे.
जर भाजप सेनेत चर्चेतून काही पर्याय निघत नसेल तर त्यासाठी नेटकाऱ्यानी काही पर्याय सुचवले आहेत. ते खर्च वाचण्यासारखे आहेत.
तर एका फोटोत युती आणि आघाडीचे कार्यकर्ते मुख्यमंत्री पदाबाबत गहाण चर्चा करताना आशा आशयाचा एक फोटो देखील जोरदार व्हायरल होत आहे.
एका फोटोत तर खर्च झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर एका शेतकऱ्यांनी कडबा झाकण्यासाठी केला आहे. त्याचा फोटो काढून ” अरे जाऊद्या मला नाहीतर सेनेचा मुख्यमंत्री होईल असं लिहला आहे.