जांब – मानकरवाडीत श्री छत्रपती हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा उत्साहात
भवानीनगर : गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी पण याला उजाळा देत गेट-टू-गेदरच्या माध्यमातून श्री छत्रपती हायस्कूल जांब- मानकरवाडी मधील मार्च 1997-98च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा एक दिवस हायस्कूलचा अनुभवला.
काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला आणि प्रत्येकांनी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधला आणि सर्व साधारण 110 विद्यार्थी त्या व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये आहेत. ज्यावेळेस व्हॉट्स् ऍप ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाल्या त्यावेळेस बऱ्याच जणांच्या चर्चेतून आपण एकत्र भेटूया, गेट-टुगेदर करूया असे विचार यायला लागले. त्यावेळी दहा जणांची एक टीम अशा 11 टीम तयार करण्यात आल्या. प्रत्येक टीमला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण त्या गेट-टुगेदर च्या कामासाठी कार्य करत राहिले.
या कार्यक्रमासाठी तब्बल 22 शिक्षक 102 विद्यार्थी आणि तीन शिपाई उपस्थित राहिले होते. सध्या सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. कोणी शासकीय विभागात पोलीस खात्यामध्ये, अन्न व औषध प्रशासन विभाग, इन्शुरन्स विभाग, शिक्षक या पेशाया मध्ये आहे तर कोणी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, प्रगतशील बागातदार, बॅंकेत तर कोनी उत्तम गृहिणी आहे, शुगर फॅक्टरी, वाइनरी फॅक्टरी, दूध डेअरी, सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले आहे, वकील, स्वतःचा व्यवसाय, कन्स्ट्रक्शन लाईन, ट्रान्सपोर्ट लाईन, सिक्युरिटी एजन्सी, कोण देशाची सेवा करत आहे.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अगदी शाळेच्या आवारातील कचरा वेचण्यापासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले. सर्व शिक्षकांना पुष्प वर्षाव आणि 11 तोफांची सलामी देऊन शाळेत दिमाखात आणण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक बी. पी. घुले, सेवानिवृत्त प्राचार्य सूर्यकांत थोरात, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पलंगे, रुपनवर, वजरीनंकर, पाटील, लोंढे, थोरात, चव्हाण, भोसले, खांडेकर, देवकर, शिंदे, खोमणे, मानकर, करे, कुंभार, आदी उपस्थित होते.