लखनौ : वेस्टइंडिज विरूध्द अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्टइंडिजने अफगाणिस्तानचा ३० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह वेस्टइंडिजने तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
3⃣2⃣ runs
2⃣ wickets
3⃣0⃣ run winA successful T20I captaincy debut for Kieron Pollard as West Indies take a 1-0 in the series against Afghanistan ?#AFGvWI ?https://t.co/98iSF64HFM pic.twitter.com/kvh6nJlSzB
— ICC (@ICC) November 14, 2019
विजयासाठी असलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजाच्या प्रभावी गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानच्या संघाला २० षटकांत ९ बाद १३४ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. अवघ्या ७ धावांवर त्याचे दोन फलंदाज माघारी परतले. रहमानुल्लाह गुरबाज शुन्यावर तर इब्राहिम जदरान २ धावांवर बाद झाले. त्यानंतर हजरत जजई (२३), असगर अफगान (२५) , नजीबुल्लाह जादरान (२७) आणि फरीद अहमदने नाबाद २४ धावा केल्या पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले.
वेस्टइंडिजकडून केसरिक विलियम्सने ४ षटकांत १७ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. कायरान पोलार्ड व हेल्डन वाल्श यांनी प्रत्येकी २ गडी तर शेल्डन काॅटरेल आणि जेसन होल्डरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
फलंदाजीत नाबाद ३२ धावा आणि गोलंदाजीत ३ षटकात १७ धावा देत २ गडी बाद करून सर्वोत्तम कामगिरी करणा-या कायरन पोलार्डला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना १६ नोव्हेंबरला (शनिवार) होणार आहे. तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत वेस्टइंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या.
वेस्टइंडिजकडून सलामीवीर एविन लुइसने ४१ चेंडूत ४ चौकार व ६ षटकांरासह सर्वाधिक ६८ धावा केल्या. तर कायरन पोलार्डने २२ चेंडूत २ चौकार व १ षटकांरासह नाबाद ३२ धावा केल्या. याशिवाय शिमरन हेटमायरने २१ आणि दिनेश रामदिनने २० धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत गुल्बदीन नाएबने ४ षटकांत २४ धावा देत सर्वाधिक २ गडी बाद केले. तर नवीन उल हक, राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.