Indian Premier League Records : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लीगच्या 17 व्या हंगामाची सुरुवात 22 मार्चपासून चेपॉकमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होईल.
महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला, परंतु तुम्हाला माहित आहे का, की असे अनेक मोठे खेळाडू आहेत जे फक्त एका आयपीएल संघासाठी खेळले आहेत. अशा खेळाडूबदल आपण जाणून घेऊयात….
1. Virat Kohli : IPL 2008 च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीला विकत घेतले. तेव्हापासून कोहली सलग 16 हंगाम आरसीबीकडून खेळला आहे. केवळ 1 आयपीएल संघाकडून खेळलेल्या निवडक खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश आहे.
2. Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आयपीएलचे 6 सीझन खेळले. मास्टर ब्लास्टरने आयपीएल 2008 ते आयपीएल 2013 पर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. तो मुंबई इंडियन्सशिवाय इतर कोणत्याही आयपीएल संघाचा भाग नाही.
3. Kieron Pollard : आयपीएल 2010 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम खर्च केली होती आणि त्यात वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डचा समावेश होता. त्यानंतर कायरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून कायम खेळत राहिला. मुंबई इंडियन्सच्या सर्वात मोठ्या मॅचविनरमध्ये त्याची गणना होते.
4. Lasith Malinga : लसिथ मलिंगाची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये 11 सीझन खेळला होता, पण मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त तो क्रिकेटर म्हणून इतर कोणत्याही टीमचा भाग नव्हता.
5. Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला होता. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत राहिला. हा वेगवान गोलंदाज गेल्या 11 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे, परंतु मुंबईशिवाय इतर कोणत्याही संघाचा भाग नाही. मुंबई इंडियन्सच्या यशात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा मानला जातो.