Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानामध्ये (Afghanistan) पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. त्याचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, यापूर्वी शनिवारीही अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. हेरात प्रांतात यामुळे २ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी झालेला हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप असल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले आहे.
अफगाणिस्तानातील (Afghanistan) हेरातमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शनिवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरातच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असले तरीही त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. भूकंपामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी तातडीने मदत मागितली आहे.
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) शनिवारी सलग तीन भूकंप झाले. त्यांची तीव्रता 6.3, 5.9 आणि 5.5 होती. माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, हेरातमधील भूकंपात मृतांचा खूपच जास्त आहे.
तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने, मृतांच्या संख्येची पुष्टी झाल्यास, तो दोन दशकांतील देशातील सर्वात प्राणघातक भूकंपांपैकी एक ठरेल. यापूर्वी, जून 2022 मध्ये पूर्व अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पर्वतीय प्रदेशात झालेल्या शक्तिशाली भूकंपात किमान 1,000 लोकांचा मृत्यू झाला होता.