पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपच्या प्रदेश कायदा / विधी तेल च्या उपाध्यक्ष पदी ॲड. विशाल डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकुळे यांनी नुकतेच मुंबई येथील पक्ष कार्यालयात अॅड. डोंगरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
ॲड. डोंगरे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, कायदा सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड उदय डबले आणि प्रदेश प्रभारी ॲड धर्मेंद्र खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
ॲड. विशाल डोंगरे यांनी महाराष्ट्र शासन च्या विविध विभाग मध्ये ते काम केले आहे, त्याचबरोबर वायू सेनेमध्ये सुद्धा सेवा केलेली आहे, तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य समन्वय समिती पुणे महसूल विभाग समितीवर सदस्य म्हणून काम केलेले आहे.
या संधीचा उपयोग पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी व विकास कामांबाबत पक्षाची संकल्पना, दृष्टीकोन आणि शासनाच्या विविध सेवा ह्या तळागाळातील सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा मानस असल्याचे ॲड. डोंगरे यांनी सांगितले. ही निवड झाल्याबद्दल भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ॲड. डोंगरे यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.