पिंपरी,(प्रतिनिधी) – श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड आणि भोसरी येथील प्लेटमास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४८० जणांनी रक्तदान केले.
रामेश्वर राठी, सूर्यकांत राठी, प्लेटमास्टर्सचे संचालक श्रीनिवास राठी, दिलीप राठी, तसेच टाटा मोटर्स, जेबीएम, सीएनएच, वाढोकर ग्रूप, पुणे इलेक्ट्रोप्लेटिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम भोसरी एमआयडीसी मधील से. १० मध्ये संपन्न झाला. यावेळी श्री शंकर महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश वैद्य, जागृती अंध मुलींची शाळेच्या संचालिका सकीना बेदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच “स्नेह सावली आपल घर”वृद्धाश्रमास आणि आळंदीच्या जागृती अंध मुलींच्या शाळेस काही मदत निधीचा धनादेश देण्यात आला. रक्तदान केल्याबद्दल ४८० रक्तदात्यांना भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना वाशीकर यांनी तर आभार सिध्दार्थ सेठिया यांनी मानले.