मुंबई – आपल्या चित्रपटातील अभिनयाने सर्वांना परिचीत असलेली अभिनेत्री कंगना रणौत सध्या अधिकच चर्चेत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असेलेली कंगना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंगनाचे काही वादग्रस्त ट्विट तर खुद्द ट्विटरने हटवले आहे. मात्र आता कंगनाला ट्विटरवर केलेली टिवटीव महागात पडताना दिसत आहे. मात्र यामुळे आपल्याला काहीही फरक पडत नसल्याचे भूमिका तिने घेतली आहे.
I don’t mean to brag,I don’t do fairness creams,item numbers,shows,big hero films and now all brands cancelled my contracts also,still whatever little I earn most of it I give away and in return gain so much more,not able to express how to encourage people to give,that’s all🙂
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2021
अभिनेत्री कंगनाने शुक्रवारी आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिने तिच्यासोबत झालेले व्यावसायिक करार रद्द केल्याचं म्हटलं आहे. मला फुशारक्या मारायच्या नाहीत, पण मी कधीही फेअरनेस क्रिमची जाहीरात करत नाही. त्याच बरोबर आयटम सॉंग, कार्यक्रम किंवा बड्या अभिनेत्यासोबत चित्रपट करत नाही. आता माझ्या सगळ्या बॅन्ड्सनी माझ्यासोबतचे करार रद्द केले आहेत. मात्र अजुनही मी जे काही कमवते, त्यातील बहुतांशी संपत्ती मी दान करते. त्याच्या बदल्यात मला आणखी फायदा होतो, असंही कंगनाने सांगितले.
What you doing for this nation is real wealth, your passion and knowledge of this nation and protectiveness for this civilisation is something I admire and I would like to acquire from you, hope we work on something together and get to be friends 🥰🙏🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2021
दुसऱ्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, तुम्ही देशासाठी जे काही करता, तिच खरी संपत्ती आहे. देशाप्रती असलेलं तुमचं प्रेम, ज्ञान आणि संस्कृती रक्षण अशा काही गोष्टी आहेत, ज्याची मी प्रशंसा करते. मला आशा आहे की, आपण एकत्र काहीतरी काम करू ज्यामुळे आपली मैत्री वाढेल.
शेतकरी आंदोलनाविरुद्ध पहिल्यांदा भूमिका घेतल्यानंतर सहा ब्रँड्सने कंगनासोबतचे करार रद्द केले होते. आता सर्वच ब्रँड्सने जाहिराती रद्द केल्याचे समजते.