मुंबई – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेनेने वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत.
दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आदित्य ठाकरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या दोघांमधील लढत रंगतदार होणार आहे.