आदित्य ठाकरे सोमवारी युवकांशी साधणार संवाद

नगर – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने दोन दिवस नगर मध्ये येत आहेत. युवासेनेच्यावतीने दि.22 रोजी सावेडी येथील माऊली संकुलात ठाकरे युवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, रवी वाकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेवक शाम नळकांडे, जिल्हा संघटक सुमित कुलकर्णी, उपशहर प्रमुख सुमित धेंडे, विभाग प्रमुख अक्षय नागापुरे आदी उपस्थित होते. यावेळी राठोड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे.

ही यात्रा राज्य भर सुरु राहणार आहे. दि.21 जुलै रोजी दुपारी 4 वाजता ते पारनेर येथे येणार आहे. येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर ते नगर येथे मुक्कमी थांबनार असून दुसऱ्या दिवशी सोमवारी सावेडी येथील माऊली सभागृहात युवकांशी संवाद साधनार आहेत. तसेच विखे कॉलेजचे 500 विद्यार्थ्यांना शिवबंधन बांधणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.