माळीवाड्यातील कचरा रॅम्प हटवा

महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्यांचे दुर्लक्ष 
मनसेची मागणी ः 45 दिवसांत कचरा रॅम्प हटविणार

नगर – माळीवाडा भागात असलेला कचरा रॅम्प मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कचरा रॅम्प तातडीने महानगरपालिकेने इतरत्र हटवावे अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु प्रशासन कोणताही निर्णय घेत नसल्याने, परिसरातील शालेय विद्यार्थी बरोबर घेऊन मनसेच्या वतीने गेटबंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचीन डफळ, नितीन भुतारे, शहर अध्यक्ष राशीनकर, ऍड अनीता दिघे, पोपट पाथरे, दत्तत्रय गाडळकर, अभिनय गायकवाड, नंदकुमार भोसले, तुषार हिरवे, गणेश मराठे, दीपक दांगट आदीसह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

माळीवाडा येथील कचरा रॅंम्प हटविण्यात यावा यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करून अद्यापही काहीही कारवाई केली नाही. या कचरा रॅम्प असुन अडचण आणि नसुन खोळंबा अशी गत आहे. या भागातून शालेय मुलांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मनपाला शाळा, पालक, मनसे यांनी प्रत्यक्ष जाऊन सांगून सुद्धा कोणी हा रॅम्प हलविण्यासाठी दखल घेत नसल्याची टिका केली. त्यामुळे मनसेचे वतीने गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपाच्या वतीने 45 दिवसात हा रॅम्प हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)