Aditya Narayan : बॉलीवूडचे गायक उदित नारायण यांची अनेक गाणी आजही तरुण वर्गाला भुरळ घालतात. त्यांचा मुलगा आदित्य नारायण हा देखील अनेक शोमध्ये गाताना दिसतो. सध्या त्याचा एका कॉन्सर्टमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे तो एका चाहत्याला मारत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आदित्यला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
आदित्य नारायणचा हा व्हिडिओ एका कॉन्सर्टचा आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला मारण्याचा प्रयत्न करत त्याचा फोन फेकून देताना दिसतो. या व्हिडिओमुळे आदित्य नारायण पुन्हा एकदा ट्रोल्सच्या कचाट्यात सापडला आहे. या वीकेंडला आदित्यने छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महाविद्यालयीन कार्यक्रमात भाग घेतला.
यादरम्यान आदित्य नारायणला एका चाहत्यावर राग आला आणि त्याने चाहत्याला माइकने मारले. ज्या तरुणावर आदित्यचा राग आला तो म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान आदित्य नारायणचा व्हिडिओ बनवत होता. पण, आदित्यला हे आवडले नाही आणि त्याने त्याच्या चाहत्यावर हल्ला केला. आदित्यची ही कृती पाहून सोशल मीडिया यूजर्सकडून संताप व्यक्त होत आहे.
What the f is wrong with Aditya Narayan🙄?
So arrogant and for what? 👀
Disrespectful towards his own fans💀? pic.twitter.com/BE1817boQ0— A̴.̴ (@andjustsmile_) February 12, 2024
आदित्य कशामुळे नाराज झाला हे व्हिडिओवरून स्पष्ट झाले नसले तरी, परफॉर्मन्स सुरू ठेवण्यापूर्वी त्याने चाहत्याचा फोन हिसकावला आणि गर्दीत फेकून दिला. त्याचे हे वागणे नेटकऱ्यांना पटले नाही. आदित्यचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आदित्य नारायण ट्रोल
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, ‘आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? त्याला कशाचा इतका अभिमान आहे?दुसऱ्याने लिहिले- ‘त्याची ही वृत्ती संतापजनक आहे.’ दरम्यान, यापूर्वी देखील आदित्य नारायण त्याच्या रागामुळे चर्चेत आला आहे. यावरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील करण्यात आली आहे.