अभिनेत्री तापसी पन्नू अनेकदा पापाराझी टाळताना दिसते. अलीकडेच जेव्हा तापसी पन्नू कारमधून निघून ऑटोने जात होती तेव्हा पापाराझींनी तिला पाहिले. तापसीचा यादरम्यानचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत तापसीने पापाराझिनां पाहिले तेव्हा तिने चेहरा लपवायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. सेलिब्रिटी अनेकदा लक्झरी कार किंवा फ्लाइटमधून प्रवास करताना दिसतात. सेलेब्स सार्वजनिक वाहतुकीत फिरताना दुर्मिळ दिसतात. तापसीच्या बाबतीतही असेच घडले.
काही काळापूर्वी लग्न झालेली तापसी पन्नू नुकतीच ऑटो प्रवास करतांना दिसली, तेव्हा तिचा व्हिडिओ काढण्यासाठी पापाराझी मागे धावू लागले. तापसीने तिचा चेहरा लपवला आणि पापाराझींना सांगितले की पळून जाऊ नका, अपघात होईल. तापसीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तापसी पन्नू एका मित्रासोबत ऑटोमध्ये फिरताना दिसत आहे. पापाराझींनी तिची दखल घेतली आणि फोटो काढायला सुरुवात केली तेव्हा ती राइडचा आनंद घेत होती. या व्हिडिओवर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान, तापसी पन्नूने मार्च 2024 मध्ये बॉयफ्रेंड मॅथियास बोईसोबत लग्न केल्याची माहिती आहे. तापसीने अद्याप लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले नाही. तिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तापसी पन्नू आता तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यात ‘फिर आयी हसीन दिलरुबा’, ‘खेल खेल में’ आणि ‘वो लड़की है कहां’ यांचा समावेश आहे.
हे वाचाल का ?
शमिता शेट्टी झाली गंभीर आजाराची शिकार