नगर -जिल्ह्यात आज 674 नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता 44 हजार 23 झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात आज 473 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 38 हजार 838 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.22 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 674 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4467 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 69, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 228 आणि अँटिजेन चाचणीत 377 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 31, अकोले 12, कर्जत 02, नगर ग्रामीण 02, नेवासे 05, पारनेर 06, पाथर्डी 01, राहुरी 01, संगमनेर 01, शेवगाव 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 02, मिलिटरी हॉस्पिटल 03, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 228 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली.
यामध्ये, मनपा 57, अकोले 08, जामखेड 05, कर्जत 05, कोपरगाव 07, नगर ग्रामीण 26, नेवासा 13, पारनेर 13, पाथर्डी 05, राहाता 12, राहुरी 20, संगमनेर 27, शेवगाव 03, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 22 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 377 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 32, अकोले 18, जामखेड 30, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 52, नेवासे 40, पारनेर 11, पाथर्डी 19, राहाता 36, राहुरी 16, संगमनेर 39, शेवगाव 21, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 02, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 473 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 102,
अकोले 52, जामखेड 35, कर्जत 19, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 29, नेवासे 24, पारनेर 12, पाथर्डी 22, राहाता 50, राहुरी 12, संगमनेर 27, शेवगाव 22, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 16, कॅंटोन्मेंट 05, मिलिटरी हॉस्पिटल 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.