कोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर

मुंबई – अमिरातीत यंदा होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांत सर्वात कूचकामी नेतृत्व विराट कोहलीकडूनच झाले आहे, अशा शब्दात माजी कसोटीपटू आजित आगरकर याने टीका केली आहे. 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाकडे बलाढ्य फलंदाज व गोलंदाज असूनही त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यासाठी विविध खेळाडूंना जबाबदार ठरवले गेले. मात्र, जर यंदाच्या स्पर्धेतील त्यांची कामगिरी पाहिली तर कोहलीच नेतृत्व करण्यात अनेकदा चुकल्याचे लक्षात येते. यंदाच्या स्पर्धेबाबत बोलायचे झाले तर कोहलीने गोलंदाजीत केलेले बदल खूपच नुकसानकारक ठरले. शिवम दुबेला पंजाबविरुद्धच्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी दिली. मात्र, त्यावेळी लोकेश राहुल सेट होता व त्याच्यासमोर दुबेसारख्या नवख्या गोलंदाजाला गोलंदाजी देण्याची चूक कोहलीने केली व त्याचा फटका संपूर्ण बेंगळुरू संघाला बसला, असेही आगरकर म्हणाला.

बेंगळुरूची फलंदाजी कागदावर तर बळकट दिसते. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर त्यांना सातत्याने अपयश येत आहे, असेही आगरकर म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.