संगमनेरमध्ये आणखी 12 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; एकूण संख्या 298 वर

संगमनेर : संगमनेरमध्ये आज गुरुवारी पहिल्या सत्रात हाती आलेल्या अहवालानुसार शहरातील दोघांसह तालुक्यातील दहा अश्या बारा रुग्णांची भर पडली आहे. रोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. आज सापडलेल्या बारा रुग्णांमुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 298 झाली आहे.

बुधवारी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत काल कोरोना बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आणि 51 रुग्णांची भर पडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आज पहिल्याच सत्रात बारा रुग्णांची भर पडल्याने ही साखळी अशीच चालू राहते की काय असा प्रश्न पडला आहे.

खासगी रुग्णालयामार्फत पाठवण्यात आलेला लखमीपूरा भागातील 50 वर्षीय इसमाचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच शासकीय प्रयोगशाळेकडूनही संगमनेर शहरातील एका इसमासह तालुक्यातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यात शहरातील देवी गल्ली परिसरात राहणाऱ्या 60 वर्षीय इसमाचा समावेश आहे.

त्यासोबतच शहरालगतच्या ढोलेवाडीमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे दिसत असून तेथील 25 वर्षीय व 16 वर्षीय तरुणांसह 14 व बारा वर्षीय मुली तसेच 65 व 21 वर्षीय महिलांना संक्रमण झाले आहे. तालुक्यातील निमोण येथूनही 65 व 45 वर्षीय इसमांसह 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव आला आहे.

आत्ता प्राप्त झालेल्या शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात घुलेवाडीतील 57 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या सत्रात तालुक्याच्या रुग्ण संख्येत नव्याने भर पडत बाधितांची संख्या त्रिशतकाच्या जवळ 298 वर जाऊन पोहोचली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.