सातारा -करोनाबाधितांची संख्या वाढतच असून जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा 11.15 टक्के झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1170 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून 693 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 24 (8771), कराड 382 (29702), खंडाळा 54 (12063), खटाव 43 (20096), कोरेगाव 142 (17368),
माण 42 (13429), महाबळेश्वर 8 (4343), पाटण 73 (8856), फलटण 61 (28825), सातारा 226 (41578), वाई 101 (13041) व इतर 14 (1416). जिल्ह्यात आजअखेर करोनाबाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख 99 हजार 488 इतकी झाली आहे.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 1 (182), कराड 8 (901), खंडाळा 0 (153), खटाव 0
(465), कोरेगाव 2 (380), माण 1 (280), महाबळेश्वर 0 (84), पाटण 0 (299), फलटण 4 (465), सातारा 1 (1231), वाई 0 (302) व इतर 1 (70). असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4812 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.