छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई ज्या पावनभूमीत झाली. त्या इतिहासाचे साक्षीदार असलेले बेलसर गाव. पुरंदर तालुक्यातील बेलसर हे प्रगतशील व ऐतिहासिक वारसा असलेले गाव. 15 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली व 9 फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले क्रियाशील, कृतिशील, अभ्यासू व अनुभवी युवा नेतृत्व उभे राहिले. उपसरपंचपदी धीरज दिलीपकुमार जगताप विराजमान झाले आणि बेलसर गावाला वेगळी विकासाची दिशा मिळाली.
मागील अनेक वर्षांपासूनचा अनुभव आणि गावचा गाढा अभ्यास या माध्यमातून गावामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम व कामे हातात घेऊन गावाला तालुक्यासोबतच राज्यात कसे उत्कृष्ट करता येईल या विचाराने धीरज जगताप यांनी काम चालू केले.
बेलसर गाव तसे कृषी व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाते. अभ्यासू आणि प्रयोगशील शेतकरी व राजकारणी याच मातीतून जन्मले असे म्हणता येईल. याच सर्व गोष्टींचा आदर्श विचार घेऊन धीरज जगताप आपल्या कामात झोकून देतात.
बेलसरमधील विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावाला जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल व त्याचा योग्य वापर कसा केला जाईल याचे काटेकोर नियोजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धीरज जगताप हे करीत असतात. अशाच नवनवीन कामांच्या माध्यमातून धीरज जगताप यांनी बेलसर गाव हे प्रगतशील गाव बनवले आहे.
विकासकामांचा धडाका
* मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट दिवे
* गटार लाइन
* रस्ते मुरमीकरण
* पाणी आडवा, पाणी जिरवा
* पाणीपातळी तपासणीसाठी पोझो मीटर बसविणे
* गावामध्ये जुने फिल्टर सुस्थितीत करून नवीन फिल्टर बसवले
* दलित वस्तीमध्ये सिमेंटकॉंक्रिट रस्ते
* गावठाणअंतर्गत पाणीपुरवठा पाइपलाइन
* पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यांमध्ये उपाययोजना
* दलित वस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बोअरवेल
* दलित वस्ती येथे साकव पूल केले पर्जन्यमापक
* गावातील व्यक्तींना वैयक्तिक शौचालय लाभ
* वृक्ष लागवड शिबिर
* पिण्याच्या पाण्यासाठी सोलर पंप
* घंटागाडी
* मुख्य रस्ता सिमेंटकॉंक्रिट
* दलित वस्ती सोलर हायमास्ट दिवे
* स्वराज्याची पहिली लढाई बेलसर येथील वारसा स्थळांची संरक्षण व देखभाल
* कचरामुक्त गाव करण्यासाठी अभियान राबवणे
* शिवमिती सोहळा साजरा करणे
* कृषी प्रदर्शन
* दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये गावाला पाणी टॅंकर
* स्मशानभूमी सुधारणा
* नेत्र तपासणी शिबिर
125 गरजूंना लाभ
महिला सभा, ग्रामसभा व पालक सभेच्या माध्यमातून समाजातील अडचणी समजून घेऊन त्यावर लगेच पर्याय किंवा मार्ग काढून नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जगताप अग्रेसर असतात. झिका विषाणू व करोना रोगाच्या कालखंडात आरोग्यसेवा करण्यासाठी केंद्रस्तरीय समितीने ग्रामपंचायतीच्या नियोजनाचे कौतुक केले होते. या रोगांच्या कालखंडामध्ये धीरज जगताप यांच्यासह सरपंच व सदस्य अतोनात काम करत होते. त्यामुळे बेलसरमधील नियोजनाचे कौतुक मोठ्या प्रमाणात केले गेले. धीरज जगताप यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरजू 125 नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे.
गावास नव्या विचारांचा…
धीरज जगताप यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य, पाणी, वीज, रस्ते, पिण्याचे पाणी, महिला सक्षमीकरण, यात्रा-जत्रांमध्ये एकता जपण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे बेलसर गावास नव्या विचारांचा, नव्या कर्तृत्वाचा, प्रयत्नशील, लोकमान्य, सर्वसामान्यांच्या
सोयी-सुविधेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून धीरज जगताप यांना ओळखले जात आहे.
आगामी ध्येय
कचऱ्यावर आधारित खतनिर्मिती प्रकल्प उभारणी (नाफेड खतनिर्मिती प्रकल्प)
वाड्या-वस्त्यांवरील रस्ते डांबर कॉंक्रिटीकरण करणे
सांडपाणी प्रक्रिया करून ते शेतीसाठी उपलब्ध करून देणे
संकलन : निखील जगताप, बेलसर, ता. पुरंदर