देशातील इतिहासाचा साक्षीदार असलेले कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक गाव. शेतकरी कुटुंबातील विक्रम गव्हाणे यांना राजकीय वलयाची झालरही नव्हती. मात्र, समाजकार्य करताना ते कळत नकळत राजकीय आखाड्यात प्रवेशित झाले. त्यांचा प्रवास हा र ाजकारणातील तरुणांना आणि नवशिक्यांना प्रेरणादायी ठरला आहे. समाजभान जपत सरपंच विक्रम गव्हाणे हे गावासाठी एक व्हिजन ठेवून कार्यरत राहिले आहेत. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी विधायक कार्य सुरू केले आहे. त्यांच्या गावविकास आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालीचा घेतलेला मागोवा…
शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोरेगाव भीमा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विक्रम कचरूदास गव्हाणे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनतेची सेवा करणे हेच स्वप्न उराशी बाळगून तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करीत असताना त्याला राजकीय पदाची गरज भासते हे जाणवल्यानेच 2021 च्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड नंबर दोनमधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.
2021 च्या अगोदर केलेले सामाजिक कार्य, तरुणवर्गाच्या विकासासाठी मनात असलेली धडपड हे पाहून गावातील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला. त्यांच्या पाठीमागे असणारी तरुणांची फौज आणि सर्वसामान्य जनतेचे प्रेम हे पाहून 2021 च्या पहिल्याच निवडणुकीत त्यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.
हजारो लोकसंख्या असलेल्या कोरेगाव भीमा गावातून ग्रामपंचायत सदस्यपद हे बिनविरोध मिळाले असताना त्यांनी कुठलाही बडेजाव केला नाही. आईवडील व ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आपल्या राजकीय कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केली. ग्रामपंचायत सदस्यपद भूषवत असतानाच त्यांना अवघ्या काही दिवसांपूर्वी सरपंचपदाची संधीदेखील मिळाली.
सरपंचपदाची संधी मिळताच गावाला सर्वात मोठा भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.
जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी मिळून देखील अनेक अडचणींमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. परंतु सरपंच विक्रम गव्हाणे यांनी त्या सर्व अडचणींवर मात करीत त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. याचे गावकऱ्यांना समाधान मिळाले आहे. हे काम करीत असताना गावाचा ध्यास आणि विकास हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावविकासासाठी दूरदृष्टी ठेवली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेबरोबरच गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती तसेच नवीन रस्ते, अपघाती चौकांमध्ये गतिरोधक, कोरेगाव भीमाअंतर्गत पथदिवे, नरेश्वर मंदिर रस्त्याचे काम, फरशीवडा येथील रस्त्याचे काम, अल आमीन कॉलेजच्या रस्त्याचे काम, दशक्रिया घाटाचे काम, अशी कामांची शृंखलाच त्यांनी पूर्ण केली.
अशी अनेक विकासकामे करीत असताना असंख्य स्वप्नं उराशी बाळगून अनेक वर्षे ग्रामस्थांकडून मागणी होत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, अग्निशामक केंद्र, लहान मुलांसाठी गार्डन, कोरेगाव भीमाच्या मुख्य रस्त्यावर वढू रोडवर देदीप्यमान कमान, दशक्रिया घाटावर नदीच्या कडेला संरक्षक भिंत, मॉर्निग वॉकसाठी ट्रॅक आदी अनेक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सरपंच विक्रम गव्हाणे काम करीत आहेत.
करोना काळातील सामान्यांप्रती माणुसकीचा भाव असो की जनमाणसाविषयी तळमळ असो. त्यांच्यासाठी धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. या समाजकार्यातून त्यांची कारकीर्द श्रावणातील पालवीप्रमाणे बहरत गेली.
करोना काळात सरपंच विक्रम गव्हाणे यांनी समाजाप्रती आपण देणं लागतो, या माणुसकीच्या भावनेतून आपलुकीचा आणि मायेचा हातभार लावला आहे. त्यांचे आजही गावकरी स्मरण करतात,
सरपंच विक्रम गव्हाणे यांनी उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, सर्व कर्मचारी, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासकामांवर भर दिला आहे. यापुढेही कोरेगाव भीमा येथील विकासाचे व्हिजन गावकऱ्यांना देण्यासाठी ते कटिबद्ध आहे.
लक्षवेधी
* सर्वांत मोठा भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला
* प्राथमिक आरोग्य केंद्र
* अग्निशामक केंद्र
* लहान मुलांसाठी गार्डन
* कोरेगाव भीमाच्या मुख्य रस्त्यावर वढू रस्त्यावर देदीप्यमान कमान
* दशक्रिया घाटावर नदीच्या कडेला संरक्षक भिंत
* मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक आदी अनेक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अविरत झटत आहेत
पाठपुरावा
नवीन व जुन्या पुलाशेजारी दोन्ही साइडला तातडीने संरक्षण भिंत बांधून, भीमा नदीवरील पूल ते वाडागाव फाटापर्यंत स्ट्रीट लाइट बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे
कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे हे तरुण तडफदार युवा सरपंच आहेत. गावातील सर्व भागातील तरुणांना सर्व स्तरावर सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा ध्यास असतो. मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये काम करीत असताना देखील सरपंच विक्रम गव्हाणे यांची भक्कम अशी साथ मला लाभते. त्यांच्या या साथीच्या जोरावर मी जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न करत आहे. एक वैचारिक प्रभल्भता असलेले व्यक्तिमत्त्व समाजाला एक विधायक दिशा देण्याचे काम करीत आहे.
श्री. केशव फडतरे,ग्रामपंचायत सदस्य, कोरेगाव भीमा
मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडून आल्यानंतर सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आले आहे. सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या सहकार्याने च प्रभाग क्रमांक 5 मधील मूलभूत सुविधा रस्ते, पाणी, ड्रेनेज लाइन, स्ट्रीट लाइट यांसारख्या असंख्य सुविधा मी माझ्या प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवू शकले. यापुढील काळातही सरपंच विक्रम गव्हाणे यांच्यासोबत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी व्यापक प्रमाणात काम करण्याचा मानस आहे.
सौ. मनीषा संपतराव गव्हाणे पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कोरेगाव भीमा
सरपंच विक्रम गव्हाणे आणि मी लहानपणापासूनचे मित्र. आदर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आधीपासूनच सामाजिक कार्यक्रम राबवत असतो. सार्वजनिक गणेशोत्सव, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे यांसारख्या समाजोपयोगी कार्यक्रमात सरपंच विक्रम गव्हाणे यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभते. एक सामाजिक भान जपणारे नेतृत्व कोरेगाव भीमा गावाला मिळाले आहे. याचा सार्थ अभिमान आहे. पाणीटंचाईच्या काळात स्व-खर्चाने पाण्याचे टॅंकर देऊन प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांची तहान भागवली होती. करोना काळात देखील संपूर्ण कोरेगाव भीमा गावासोबतच प्रभाग क्रमांक 2 मध्ये सरपंच विक्रम गव्हाणे यांनी विशेष लक्ष देऊन गरजवंतांना अन्नधान्य किट वाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप करून प्रभागाची योग्य ती काळजी घेतली. सरपंच विक्रम गव्हाणे यांचा मित्र म्हणून तर आहेच; पण एक आदर्श सरपंच म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
श्री. कपिल रमेश अगरवाल, माजी खजिनदार, आदर्श प्रतिष्ठान कोरेगाव भीमा.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतचे सरपंच विक्रम गव्हाणे यांचे काम अतिशय उत्कृष्ट असून ते सदैव विकासकामांसाठी धडपडत असतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आदी ठिकाणी जाऊन कामाचा पाठपुरावा करीत असतात. मी माझ्या कारकिर्दीत अनेक सरपंच, उपसरपंच पाहिले. मात्र, दिवसरात्र गावाच्या विकासासाठी झटणारा विक्रम गव्हाणे यांच्या रूपात मी पहिला सरपंच पाहिला. याचा मला सार्थ अभिमान आहे.
श्री. रतन दवणे, ग्रामविकास अधिकारी कोरेगाव भीमा
नगर महामार्गावर गतिरोधकसाठी प्रयत्नशील
पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील रस्त्यांवर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देत केली. कोरेगाव भीमा येथे कल्याणी चौक, वाडागाव फाटा, डिंग्रजवाडी फाटा येथे अपघात होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अपघात प्रवण ठिकाणी वाहनांच्या वेगांना आवर घालण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता राहुल कदम यांना भेटून कोरेगाव भीमा येथील रस्त्यांवर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी सरपंच विक्रम गव्हाणे यांनी केली. यावेळी पेरणे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ वाळके आदी पदाधिकाऱ्यांना घेऊन सरपंच गव्हाणे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.
कोरेगाव भीमा येथील नवीन व जुन्या पुलाशेजारी दोन्ही साइडला तातडीने संरक्षण भिंत बांधून भीमा नदीवरील पूल ते वाडागाव फाटापर्यंत स्ट्रीट लाइट बसविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.