सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका सध्या अव्दैत-नेत्राच्या लग्नासंबंधीच्या रहस्यमय वळणावर आली असून अव्दैत आणि नेत्राच्या लग्न कस होणार यांची चर्चा सध्या सुरु आहे. या मालिकेतील या जोडप्याच्या लग्नाला घेऊन सर्वच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अशात या मालिकेतील नेत्रा हे पात्र साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या तिच्या खऱ्या आयुष्यातील रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.
नुकताच तिने ३३ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर असंख्य शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीवर अक्षरश: सर्वांनी कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र अभिनेत्रीसाठी एका खास व्यक्तीने केलेल्या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर तितीक्षा आणि हा अभिनेता रिलेशनशिपमध्ये असल्याचाही चर्चा रंगली आहे. तितीक्षासाठी दृश्यम २ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेने ही खास पोस्ट केली आहे.
सिद्धार्थने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये त्याने तितीक्षाला मिठी मारली आहे. त्यांचा असा रोमँटिक आणि क्युट असा एकत्र फोटो पाहून सिद्धार्थ-तितीक्षा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तितीक्षानेही वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्यासह कुटुंबीय आणि सिद्धार्थही दिसत आहे. यावरूनही चाहते यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा करत आहे. या फोटोवरून आता चाहते अंदाज लावत आहे की सिद्धार्थ-तितीक्षा एकमेकांना डेट करत आहे. मात्र या अफवांवर या दोघांकडूनही कुठली अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.