सोनई -अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची विधिवत पूजा करून सहकुटुंब दर्शन घेतले. सोबत आई, पती राज कुंद्रा, लहान मुलगी असा परिवार होता.
मी दरवर्षी शनी दर्शनासाठी येत असते. मला एक आत्मिक आनंद, समाधान, ऊर्जा मिळते. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून नेत्रदानाचा संकल्प केला होता, त्यावर त्यांनी उजाळा दिला. देवस्थानचे वतीने उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी स्वागत केले.